Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अत्यंत अमानुष आणि भ्याड हल्ल्याचा निषेध : पंतप्रधान

Spread the love

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला असून शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, अशा शब्दांत इशारा दिला आहे. ‘पुलवामा हल्ला हे अत्यंत अमानुष असं कृत्य असून या भ्याड हल्ल्याचा मी कठोर शब्दांत निषेध करत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. संपूर्ण देश शहिदांच्या कुटुंबीयांसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे. हल्ल्यात जे जवान जखमी झाले आहेत त्यांना लवकरात लवकर स्वास्थ्य लाभो ही पार्थना’ अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा करून हल्ल्याबाबत विस्तृत माहिती घेतली आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या हल्ल्यानंतर सरकारी पातळीवर वेगाने घडामोडी सुरू झाल्या असून राजनाथ सिंह उद्या श्रीनगरमध्ये जाणार आहेत. राजनाथ यांनी पाटण्यातील आपली नियोजित सभा रद्द केली आहे.
कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची उद्या बैठक
काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर घेतला असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक उद्या सकाळी सव्वानऊ वाजता बोलावण्यात आली आहे, असे वृत्त एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थ मंत्री पीयूष गोयल यांची उपस्थिती असेल. या बैठकीत पुढील कारवाईबाबतची व्यूहरचना आखण्यात येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, पुलवामा हल्ल्याची विस्तृत माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृह मंत्री व वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांकडून घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. दुसरीकडे गृहमंत्री राजनाथ यांनीही डोवल यांच्यासह आयबी प्रमुख व अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भटनागर यांच्याशीही राजनाथ फोनवरून बोलले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!