देवेंद्र -उद्धव यांची अखेर गाठ-भेट !!

Advertisements
Advertisements
Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रकांत पाटील होते. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे १ तास चर्चा झाली. दरम्यान, उद्धव यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे नंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपने युतीबाबत दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा अधिक वाट न पाहता शिवसेना थेट उमेदवारांची नावं जाहीर करेल, असा निरोप शिवसेनेकडून भाजप नेतृत्वाला देण्यात आल्याच्या बातम्या आज सूत्रांच्या हवाल्याने झळकत होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी २५ जागा शिवसेनेला सोडण्यात याव्यात. विधानसभेला १५० जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हव्या. केंद्रात एनडीएचं सरकार आल्यास पंतप्रधान भाजपचा असेल मात्र राज्यात युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असे वक्तव्य शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते. अशाच प्रकारचा प्रस्ताव उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Advertisements

 

आपलं सरकार