पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सर्वत्र निषेध

Advertisements
Advertisements
Spread the love

‘दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ’, मुख्यमंत्र्यांनी हल्ल्याचा केला निषेध

>काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे, त्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल, आम्ही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, या हल्ल्यामुळे काही काळासाठी आम्ही युतीची बोलणी थांबवली आहेत- मुख्यमंत्री
>शहीद जवानांचा आकडा 40 च्या जवळपास, विजय कुमार यांची माहिती
>राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून घटनेची चौकशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात.
>काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून भ्याड हल्ल्याचा निषेध, जवानांना श्रद्धांजली
>कॉंग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी हल्लाचा निषेध व्यक्त केला आहे.
>काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं ऐकल्यानं अतीव दुःख झालं. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो- परराष्ट्र मंत्री, भूतान
>जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या जम्मूतून श्रीनगरला जाणार
>हंसराज अहिर यांच्याकडूनही जवानांना श्रद्धांजली, दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार
>अर्थमंत्री अरुण जेटलींकडून शहीदांना मानवंदन अन् घटनेचा तीव्र निषेध, जवानांच्या कुटुबींच्या पाठिशी असल्याची ग्वाही
>भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे – मोहन भागवत

Advertisements

आपलं सरकार