Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“राफेल” घोटाळा नाही तर “जेपीसी”ची भीती का ? : राहुल गांधी

Spread the love

अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देण्यासाठीच नवा करार

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी राफेल करारासंदर्भात एनडीए सरकारवर पुन्हा एकवार दोषारोप केले. नवा करार केवळ अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देण्यासाठीच करण्यात आला, असा आरोप राहुल यांनी केला. त्यांनी अधिकाऱ्यांच्या एका पत्राचा हवाला देत राहुल म्हणाले की नवा करार किंमत आणि जलद डिलिव्हरीसाठी करण्यात आल्याच्या पंतप्रधानांच्या दाव्याची पोलखोल झाली आहे.

राफेल करारासंदर्भातला कॅग अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘कॅग अहवालात मध्यस्थांच्या डिसेंट नोटची चर्चाच केलेली नाही. त्यामुळे या अहवालाला जास्त महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही,’ अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी व्हावी या आपल्या मागणीचा राहुल यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले, ‘घोटाळा झालेला नाही, तर तुम्हाला जेपीसी (संयुक्त संसदीय समिती) गठित करण्याच्या आदेशाची भीती का वाटते?’
याआधी राफेल करारासंबंधी पंतप्रधान मोदींना राहुल देशद्रोही म्हणाले आहेत, तर अनिल अंबांनींनी मध्यस्थीच्या रुपात काम करून गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राहुल यांनी आपल्या आरोपांना आधार म्हणून एका ई-मेलचा हवाला दिला. अनिल अंबानी यांना भारत आणि फ्रान्सदरम्यान होणाऱ्या या करारासंदर्भात आधीपासूनच माहिती होती, असा दावा या ईमेलमध्ये करण्यात आला आहे. भाजपने हा आरोप फेटाळून लावला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!