Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या “ट्विट”वर मनसेचा शोधप्रबंध …

Spread the love

मोदींच्या “ट्विट”वर मनसेचा शोधप्रबंध …

पंतप्रधान मोदी यांनी नेमके किती ट्विट केले ?
अभ्यासाचा कालावधी : २०१० ते २०१४ आणि २०१४ ते २०१९
२०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी केले तब्बल १३९९० ट्विटस
४५ टक्के ट्विटस हे भारत माता की जय, हिंदुस्तान, गो-हत्या आदी विषयांवर
२८ टक्के ट्विट्स हे शुभेच्छांसाठी

सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पंतप्रधान झाल्यानंतर केलेले ट्विट मोदींनी पाहिले तर ते स्वत:लाही मतदान करणार नाहीत, असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटचे विश्लेषण (डेटा अॅनलिसिस) करताना देशपांडे यांनी २०१० ते २०१४ आणि २०१४ ते २०१९ अशी विभागणी करून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
काय म्हटलंय मनसेने..
पंतप्रधान मोदी हे २०१० ला ट्विटरवर सक्रिय झाले. २०१० ते २०१४ या कालावधीत मोदींनी ३९२० ट्विट केले. तर २०१४ ते २०१८ या कालावधीत त्यांनी तब्बल १३९९० ट्विटस म्हणजे सुमारे तीन पट अधिक प्रमाणात त्यांनी हे ट्विट केले. माहिती अधिकाराअंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट हे स्वत: मोदी हाताळतात. एका ट्विटला २ मिनिटे असे गृहित धरले तर मोदींनी १३९९० ट्विट्ससाठी २७९८८० मिनिटे म्हणजेच त्यांनी ट्विटरवर २० दिवस आणि फेसबुकवर २० दिवस घालवले आहेत. मोदींनी जनतेला दिलेला वेळा हा उपयोगी होता का? त्यांनी केलेल्या ट्विटपैकी ४५ टक्के ट्विटस हे भारत माता की जय, हिंदुस्तान, गो-हत्या आदी विषयांवर केले आहेत. ज्या विकासाचे नाव घेऊन मोदी हे सत्तेवर आले. त्याबद्दल हे ट्विट्स नाहीत. देशभक्तीचे प्रमाणपत्र भाजपा देणार का? भाजपाला पाठिंबा दिला तर ती व्यक्ती देशप्रेमी नाही तर देशद्रोही का?
मोदींनी २८ टक्के ट्विट्स हे शुभेच्छांसाठी केले आहेत. मग विकासकामांसाठी त्यांनी किती ट्विट्स केले. जे ट्विट केले ते भूमिपूजन, प्रकल्प आणला, काम सुरू अशी होती. यात इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन यासंबंधीचे ट्विट्स आहेत. या भूमिपूजनानंतर त्यांचे काय झाले हे माहीत नाही.
पंतप्रधान मोदी हे १८ ते २० तास काम करतात. ते सातत्याने कार्यरत राहतात, असे मार्केटिंग भाजपाकडून केले जाते. सर्वसामान्य माणूसही ८ तासच झोपतो. मोदी फक्त त्यांच्यापेक्षा २ तास कमी झोपतात. विशेष म्हणजे ५ वर्षांतील ३ महिने त्यांनी काहीच केलेले नाही. मग त्यांच्या झोपेचा आणि कामाचा एवढा का बाऊ केला जातो. कोण किती तास काम करतो यापेक्षा काय काम करतो हे महत्वाचे आहे.
२०१३ मध्ये मोदींनी भारत कसा संकटात आहे, असे ट्विट केले होते. यात चीन आणि पाकिस्तानबद्दल त्यांनी लिहिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी यावर एकही ट्विट केल्याचे दिसत नाही. उरी हल्ला, काश्मीरवरील दहशतवादी हल्ल्यावर ते गप्प का, पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानला खडसवणारे एकही ट्विट त्यांनी केलेले नाही. पूर्वी पेट्रोल दरवाढीवर त्यांनी ट्विट केले होते. त्यावेळीही त्यांनी भारतीय नव्हे तर गुजराती लोकांबद्दल भाष्य केले होते. आजही पेट्रोल दरवाढ होते. त्यावर ते काहीही बोलत नाही. ते फक्त त्यांची ‘मन की बात’ करतात.
सोशल मीडियावर बोलण्यावर अघोषित आणीबाणी सुरू आहे. मोदींनी २४ ऑगस्ट २०१४ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि तत्कालीन सरकारवर यासंबंधी टीका करणारे ट्विट केले होते. आज सोशल मीडिया सोडा अमोल पालेकर, नयनतारा सहगल यांच्यासारख्या अनेकांना प्रत्यक्षात बोलण्यासही बंदी घातली जाते. मनसेच्या कार्यकर्त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. मोदींविरोधात बोलणाऱ्यांना तुरूंगात टाकले जाते. पोस्ट डिलिट करण्यास सांगितले जाते. आज तुम्ही घाबरल्यामुळे व्हॉटसअपसाठी नियमावली तयार केली आहे. ट्विटरच्या अधिकाऱ्यांना संसदेत बोलावले आहे. फेसबुकसाठी जाचक अटी तयार केल्या आहेत.
जो सोशल मीडिया वापरून सत्तेवर आला आहात. तोच मीडिया त्यांच्या अंगावर आला आहे. पण भारताचा नागरिक जागरूक आहे. ते आपले स्वातंत्र्य हिरावू देणार नाहीत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी वेगळंच ट्विट करू लागले. कधी कचरा साफ करणारे चॅलेंज, फिटनेस चॅलेंज तसेच कचरा साफ करतानाचा फोटो काढून ट्विट करायचं. काश्मीरमधील दल लेकमध्ये कोणी नसताना मोदी हात दाखवत होते. यामुळे फक्त मोदींचे नव्हे तर भारतीयांचे हसू झाले.
शेतकरी आत्महत्या यावर मोदींना एकदाही ट्विट करावसं वाटलं नाही. भ्रष्टाचारावर दोन ट्विट केले. ते पण सारवासारवी करणारे. मोदींच्या मंत्र्यांवर इतकंच काय मोदींवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण यावरही मोदींनी काही म्हटले नाही.
मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. महिला सुरक्षेबाबत बोलणारे मोदी देशात एवढे बलात्कार होतात, त्यावर कधीच भाष्य करत नाहीत. यावेळी त्यांना बोलावसं वाटलं नाही का? पीडितांच्या मागे मोदींना उभे राहावे असे वाटले नाही का?
सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे २०१४ मध्ये बेरोजगारीवर तत्कालीन सरकारवर टीका करत भाजपा युवकांना रोजगार देईल म्हटले होते. पण आज परिस्थिती उलट आहे. बेरोजगारीचा दर वाढला आहे. बेरोजगारीचा अहवाल दाबला जात आहे. लोकांना घाबरल्यामुळे खरी गोष्ट त्यांच्यापर्यंत लपवली जात आहे.
मोदींना सर्वसामान्यांसाठी ५ वर्षे वेळ मिळाला नाही. त्यांना परदेशात फिरायचं होतं. मोदींना आंतरराष्ट्रीय नेते व्हायची हौस लागली होती. त्यामुळे ते भारताला विसरले. दुबई, अमेरिकेत जाऊन ढोल वाजवून लोकांच्या टाळ्या घ्यायच्या होत्या. पण लोक हे विसरलेले नाहीत. आपलेच सर्व ट्विट्स पाहिले तर मोदी हे स्वत:लाही मतदान करणार नाहीत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!