Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“मुलायम गुदगुल्या” आणि सुप्रिया सुळे …

Spread the love

“त्यांनी” मनोहन सिंग यांनाही शुभेच्छा दिल्या होत्या …

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी लोकसभेत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशा शुभेच्छा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आपले मत नोंदवले असून २०१४ मध्येही मुलायम सिंह यांनी अशीच इच्छा व्यक्त केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मुलायम सिंह यांचे विधान मी ऐकले. ते २०१४ मध्येही असेच म्हणाले होते. त्यावेळी मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते,’ अशी उपरोधिक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली. मुलायम सिंह यांनी २०१४ मध्ये मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या निवडणुकीत मनमोहन सिंग यांचे सरकार पडले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!