महिलेची छेड काढणारा सीआरपीएफ जवान गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

गोव्यातील कलंगुट बीचवर महिलेशी गैरवर्तवणूक करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला अटक करण्यात आली आहे. राजवीर प्रभुदयाल सिंह असं या जवानाचं नाव असून तो राजस्थानचा रहिवासी आहे. कंलगुट पोलीस ठाण्याचे अधिकारी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला बीचवर आंघोळ करत असताना जवानाने तिच्याशी असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली. यासोबत महिलेला चुकीच्या पद्दतीने स्पर्श केल्याचाही आरोप आहे. मंगळवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली. महिला कलंगुट बीचवर आपल्या पती आणि मुलांसोबत असतानाच सीआरपीएफ जवानाने हे कृत्य केलं. ‘महिलेने केलेल्या आरोपानुसार, आरोपी तिथेच जवळ आंघोळ करत होता. महिलेशी असभ्य वर्तन करण्यासोबत आरोपीने तिच्या पतीलाही मारहाण केली’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत जवानाविरोधात गुन्हा दाखल केला आणि अटक केली. राजवीर सिंह सीआरपीएफ जवान असून सध्या तो मध्य प्रदेशातील प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होता.

Advertisements

आपलं सरकार