Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सनी लिओनी रमली मुलांमध्ये …

Spread the love

छोट्या पडद्यावरील बिग बॉस या शोच्या माध्यमातून सनीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. बॉलीवूडला आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी ही अभिनेत्री आता तीन मुलांची आई झाली असून तिने नुकताच तिच्या मुलांचा पहिला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सनीने शेअर केलेल्या व्हिडिओला एक साजेशी कॅप्शनही दिली आहे. या कॅप्शनमध्ये तिने तिच्या लेकीचा निशाचा उल्लेख केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘आयुष्यातील प्रत्येक क्षण कुटुंबियांसोबत व्यतीत करणं हाच माझ्या जीवनाचा खरा मंत्र आहे. निशाच्या येण्यामुळे आमच्या आयुष्याला अर्थ मिळाला. तर नोहा आणि अशहच्या आगमनामुळे आमचं कुटुंब पूर्ण झालं. निशासुद्धा लहान आहे. मात्र तरीदेखील ती नोहा आणि अशहची छान काळजी घेते. निशा त्यांची बेस्ट सिस्टर आहे, असं सनीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
या व्हिडिओमध्ये सनी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसून येत आहे. यात सनीने तिच्या दोन्ही मुलांसाठी खास दोन केक आणल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच सनी आणि डॅनियलने निशासोबत मिळून हा केक कापला.
दरम्यान, कुटुंबासोबत व्यस्त असलेली सनी लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सनी एका मल्याळम चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यु करत आहे. या चित्रपटाबरोबरच ती दाक्षिणात्य सुपरस्टार माम्मुटीसोबत देखील स्क्रीन शेअर करणार आहे. ‘मधुरा राजा’ या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर तिचा ‘रंगीला’ या मल्याळम चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!