Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“त्यांना” नोकऱ्या दिल्या पण पगार नाही …

Spread the love

भारताची जगविख्यात नेमबाज राही सरनोबतला गेल्या दोन महिन्यांपासून पगार मिळत नसल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राहीबरोबरच पूजा घाटकर आणि दिपिका जोसेफ यांनाही पगार मिळाला नसल्याची गोष्ट प्रकाशझोतात आली आहे.

रशिया येथील ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहीने कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर राहीचा सत्कार महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला होता. त्यावेळी राहीला पुण्यातील उप जिल्हाधिकारी या पदावर रुजू करण्यात आले होते.
या साऱ्या प्रकाराबाबत राही म्हणाली की, ” पुण्यातील उप जिल्हाधिकारी या पदावर रुजू करण्यात आले होते. त्याबद्दल मी राज्य शासनाची आभारी आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून मला पगारच देण्यात आलेला नाही. ही गोष्ट मी सकारात्मकपणे घेत आहे. फक्त ही नोकरी सरकारने कायम ठेवावी, एवढीच विनंती मी त्यांना करत आहे.”
कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला होता. नेमबाजीमधील २५ मीटर पिस्तल प्रकारात राही ही एकमेव आघाडीची नेमबाजपटू आहे. तिने यापुर्वी २००८ साली युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने २५ मीटर पिस्तल प्रकारात प्रथम सुवर्ण पदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण पदकांची कामगिरी केली.
२०११ साली आशियाई स्पर्धेत तिने कास्य पदकाची कमाई करीत लंडन आॅलंम्पिकचे दारही आपल्यासाठी खोलले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकाविले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महीला ठरली. यानंतर चॅगवॉन येथे आयएफएस विश्व नेमबाजी स्पर्धेतही सुवर्ण पदक पटकाविले.
ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिनेही सुवर्ण पदक, तर इचीआॅनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कास्य पदक पटकाविले. २२ आॅगस्ट २०१८ साली जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर नेमबाजीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारी व महिलांमध्ये पहिली भारतीय ठरली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी अर्जुन पुरस्कार समितीकडे मागील आठवड्यात शिफारस केली होती. त्यानूसार या समितीकडून बुधवारी (दि.१८) रोजी तिला हा पुरस्कार जाहीर झाल्याचा मेल आला. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याचे क्रीडानगरीत समजताच आनंदाची लाट पसरली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!