११ कोटींचे एक दिवसीय उपोषण …

Advertisements
Advertisements
Spread the love

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत उपोषण केले. चंद्राबाबूंच्या या उपोषणाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाङख अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव, शरद यादव आदी नेत्यांनी भेट देत आपले समर्थन दर्शवले. मात्र, चंद्राबाबूंच्या दिल्लीतील उपोषणासाठी 11 कोटी रुपयांचा खर्च आल्याची माहिती आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी नवी दिल्लीत मोदी सरकारविरुद्ध उपोषण करत, आपल्या मागण्या मांडल्या. चंद्राबाबूंच्या या उपोषणाला शरद पवारांपासून ते फारुक अब्दुल्लांपर्यंत, अरविंद केजरीवालपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत सर्वांनीच आपला पाठिंबा दर्शवला. तर, या उपोषणासाठी आंध्र प्रदेशमधूनही तेलुगू देसम पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याला समर्थन देण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे, या उपोषणासाठी आंध्र प्रदेश ते दिल्ली अशा दोन रेल्वे बुक करण्यात आल्या होत्या. या रेल्वेतील 20 बोगींमधून केवळ टीडीपीचे कार्यकर्ते आणि चंद्राबाबूंचे समर्थक दिल्लीसाठी प्रवास करुन आले आहेत. आंध्र प्रदेश सरकारने या समर्थकांची सर्व व्यवस्था केली होती. त्यासाठीचा खर्चही आंध्र प्रदेश सरकारच्या तिजोरीतूनच करण्यात आला आहे. याबाबत इंडिया टुडे या वृत्तसंस्थेने कागदोपत्रे सादर केली आहेत.
दरम्यान, 11 फेब्रवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण चंद्राबाबू यांनी केलं होतं. या उपोषणाला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फाङख अब्दुल्ला, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव, शरद यादव आदी नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चंद्राबाबूंच्या मागणीला पाठिंबा दिला.

Advertisements

आपलं सरकार