सई ताम्हणकरची सोशल मीडियाशी कट्टी !!

Advertisements
Spread the love

सोशल मीडियावर सई ताम्हणकर चांगली लोकप्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून रजा घेण्याचा निर्णय सईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. याबद्दल सई ताम्हणकरने सांगितले की, मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला खूप आवडतो. त्यामुळेच मी सोशल मिडीयावर मी नेहमीच सक्रिय होती. मात्र, या धावपळीच्या आयुष्यात काही वेळ स्वत:साठी मिळावा आणि स्वत:मध्ये काही चांगले बदल करायचे असल्याने मी सध्या सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सई ताम्हणाकरचे इन्स्टाग्रामवर साडेनऊ लाखापेक्षा जास्त, ट्विटरवर ७९ हजारापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. शिवाय १० लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स फेसबुकवर आहेत. सध्या तरी सईने एक महिना सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एका महिन्यानंतर सई कमबॅक करताना काही सुखद धक्का देणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या माध्यमाद्वारे त्यांच्या जीवनातील जुन्या आठवणी, आनंद, दु:ख त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. चित्रपटसृष्टीमधील बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.