मुलायमसिंग यांच्या मोदींना गुदगुल्या …

Advertisements
Advertisements
Spread the love

मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे- मुलायम

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि लोकसभेतील ज्येष्ठ सदस्य मुलायमसिंह यादव यांनी आज लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करताना मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा उघडपणे बोलून दाखवत जणू गुद्गुल्याच केल्या त्यावर मोदींनी सभागृहातच हात जोडून मुलायम यांचे आभार मानले.
‘आम्हाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तुम्हीच पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हा’ असे विधान मुलायम यांनी मोदींकडे पाहून केले. त्यावर सभागृहात हास्याची लकेर उठलीच शिवाय सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून मुलायम यांच्या विधानाचे स्वागत केले.
पंतप्रधानांनी सर्वांसोबत मिळून मिसळून काम केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानत आहे. जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्याकडे काही काम घेऊन आलो तेव्हा तुम्ही तत्काळ आदेश देऊन ते काम करून घेतले. या कार्यतत्परतेचा मी आदर करतो, अशा शब्दांत मुलायम यांनी मोदींची स्तुती केली. या सभागृहातील सर्वच सदस्य पुन्हा एकदा निवडून यावेत, अशा शुभेच्छाही मुलायम यांनी दिल्या.

Advertisements

आपलं सरकार