Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘ग्रॅमी’ पुरस्कारात यावर्षी ” लेडीज फर्स्ट !!

Spread the love

संगीत क्षेत्रातील मानाचा समजला जाणाऱ्या ६१वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजलिसमध्ये दिमाखदार वातावरणात पार पडला. प्रसिद्ध गायिका लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली या कलाकारांनी दमदार कामगिरीसाठी ग्रॅमी पुरस्कार पटकावले. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महिला कलाकारांने वर्चस्व राहिले.
हॉलिवूड अभिनेता-गायक चाइल्डिश गॅम्बिनोचे ‘धीस इज अमेरिका’ हे गाणे यंदाचे सर्वोत्कृष्ट गाणे ठरले, तर लेडी गागाने तीन ग्रॅमी पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. तिचे ‘व्हेअर डू यू थिंक यू आर गोइंग’ हे गाणे सर्वोत्कृष्ट सोलो परफॉर्मन्स ठरले. ब्रॅडली कूपरसोबत तिने गायलेल्या ‘शॅलो’ या गाण्याने ‘सर्वोत्कृष्ट ग्रुप परफॉरमन्स’चा ग्रॅमी पुरस्कार पटकावला.

रहमान, मिशेल ओबामांची उपस्थिती
भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपली मुलगी रहिमासह ग्रॅमी सोहळ्याला हजेरी लावली. याबाबतची छायाचित्रे रहमान यांनी ‘ट्विटर’वर शेअर केली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामाही या सोहळ्याला उपस्थित होत्या. ‘आयुष्यात संगीताने मोलाची भूमिका बजावली असून, प्रत्येक टप्प्यावर संगीत आणि गाण्यांची मला साथ मिळाली,’ अशा भावना मिशेल यांनी व्यक्त केल्या.
या पुरस्कारांमध्ये पुरुष कलाकारांनाच प्राधान्य दिले जात असल्याची टीका गेल्या वर्षी करण्यात आल्यानंतर यंदाच्या पुरस्कारांमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आले होते. पुरस्कारविजेते, समारंभात कला सादर करणाऱ्यांमध्ये महिला कलाकारांचा समावेश करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर लेडी गागाने ‘ट्विटर’वरून आनंद व्यक्त केला. ‘हा पुरस्कार मिळाल्याचे मला आश्चर्य वाटले. या पुरस्कारासाठी परीक्षण समितीचे आभार,’ असे ट्विट तिने केले. १५ वेळा ग्रॅमी पुरस्काराची मानकरी ठरलेली गायिका एलिसिया कीजने यंदा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
‘ग्रॅमी’विजेते
अल्बम ऑफ द इअर : केसी मसग्रेव्स (गोल्डन अव्हर्स), रेकॉर्ड ऑफ द इअर : चाइल्डिश गॅम्बिनो (धीस इज अमेरिका), सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार : डुआ लिपा : सर्वोत्कृष्ट रॅप अल्बम : कार्डी बी (इन्वेशन ऑफ प्रायव्हसी), सर्वोत्कृष्ट रॅप साँग : ड्रेक (गॉड्स प्लॅन), सर्वोत्कृष्ट गाणे : चाइल्डिश गॅम्बिनो (धीस इज अमेरिका), सर्वोत्कृष्ट पॉप/ग्रुप परफॉर्मन्स : लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर (शॅलो), सर्वोत्कृष्ट पॉप सोलो परफॉर्मन्स : लेडी गागा (व्हेअर डू यू थिंक यू आर गोइंग).

आपलं सरकार

Click to listen highlighted text!