काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा आजन्म आरक्षित : अमित शाह

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा आजन्म आरक्षित आहे, अशा शब्दात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीका केली. राहुल गांधी यांनाही त्यांनी लक्ष्य केले. ‘राहुल गांधी अविवाहित आहेत म्हणून प्रियांका राजकारणाच्या मैदानात उतरल्या आहेत,’ असेही ते म्हणाले.
गुजरातमधील गोधरा येथे शाह कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले, ‘काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता कधी पंतप्रधान बनण्याचा विचारदेखील करू शकत नाही. याउलट भाजपमध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य बुथ कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो आणि एक ‘चहावाला’ पंतप्रधान होऊ शकतो. भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मोठ्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या विशेष परिवारात जन्म घेण्याची आवश्यकता नसते.’

Advertisements

आपलं सरकार