Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गल्ली ते दिल्ली : दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

Spread the love

#MahanayakOnline#News_Updates

१. मुंबईः मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना २२ फेब्रुवारीपर्यंत मुंबई हायकोर्टाचा अटकपूर्व जामीन मंजूर
२. पालघर येथील सभेसाठी प्रकाश आंबेडकर यांचा बोरिवली-पालघर असा लोकलने प्रवास.
३. पालघरच्या सभेत मोदी सरकारवर प्रकाश आंबेडकरांचा प्रहार.
४. लखनऊ: पंतप्रधान मोदींनी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी अनिल अंबानीला फायदा मिळवून दिला; राहुल गांधींची टीका
प्रियंका गांधी वड्रा आणि ज्योतिरादित्य सिंदीयांच्यावर राज्यात काँग्रेसला मजबूत करण्याची जबाबदारी , उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार, इंदिरा गांधींच्या वानर सेनेच्या धर्तीवर बनविली प्रियंका सेना
५. प्रियंकाला देशवासियांच्या सेवेसाठी सोपवतो, कृपया त्यांची काळजी घ्या : रॉबर्ट वड्रा
६. अहमदाबाद: भाजप कार्यकर्त्यांच्या धमकीमुळे एच. के. आर्टस महाविद्यालयातील व्याख्यान रद्द करण्यात आल्याचा आमदार जिग्नेश मेवानींचा आरोप
७. नवी दिल्ली: ट्विटर इंडियाच्या प्रतिनिधींसह ट्विटरच्या टीम संसद भवनात दाखल; संसदीय समितीसमोर माहिती तंत्रज्ञानाच्या मुद्यावर चौकशी
पिंपरी चिंचवड: विरोधी पक्षांनी केले गाजर आंदोलन; मुख्यमंत्र्यांनी शास्ती कर माफ केल्याची तिसऱ्यांदा केलेली घोषणा हवेत विरल्याने आंदोलन
८. केरळमध्ये काकूंकडून ९ वर्षीय पुतण्याचे लैंगिक शोषण
९. औरंगाबाद: शेंद्रा एमआयडीसीत हरमन कंपनीसमोर एका वाहनात ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला, प्रकाश कासारे असं मृताचं नाव
१०. गोवाः दुबईतून आलेल्या महिलेकडून विमानतळावर १८ लाखांवर किमतीचे सोने जप्त
११. उरीमधील लष्कराच्या कॅम्पलगत रात्री दहशतवाद्यांच्या संशयास्पद हालचाली, सुरक्षा दलांकडून कसून तपासणी सुरू
१२. पुण्यात अतिरिक्त आयुक्तांना महापौरांसमोर बेदम मारहाण
१३. चंद्रपूर : वेडसर मुलाने केली आईची हत्या, मूल येथील घटना. मुलाला अटक.
१४. सत्ताधाऱ्यांनाच दाभोलकर- पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास नकोसा : मेघा पानसरे
१५. नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये आमदारांच्या खरेदीसाठी भाजपाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवरून लोकसभेत गोंधळ, कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित

आपलं सरकार

Click to listen highlighted text!