Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण

Spread the love

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांना Service Selection Board (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत एसएसबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List आणि महत्त्वाच्या तारखा (Important Dates) यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावेत.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्या संबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना घेऊन येणे आवश्यक आहे.

अ) कंबाईंड डिफेंस सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.

ब) एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

ड) University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्र.0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!