बँक अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टरला फसवले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

सावधान : डॉक्टरचे दोन लाख नव्वद हजार रुपये लांबवले
पुण्यातील एका डॉक्टरला मॅसेजद्वारे फसवणूक करत लूटल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या बिपिन महतो नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. बिपिनवर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुण्यातील एका डॉक्टरचे तब्बल दोन लाख नव्वद हजार रुपये परस्पर बँक खात्यामधून लांबवल्याचा आरोप आहे. बिपिननं २१ नोव्हेंबर २०१८ ला या डॉक्टरला आपण बँक एक्झिक्युटीव्ह असल्याचं सांगत त्यांना बँकेच्या सेवांची माहिती दिली. तसेच या सेवांचा लाभ घेण्यासाठी मोबाइलवर आलेल्या मसेजमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. तसेच संभाषणादरम्यान त्यांच्या खातेक्रमांकाची खातरजमा केली. मात्र डॉक्टरने या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना आणखी काही मॅसेज आले आणि त्यातून एवढी मोठी रक्कम त्यांच्या खात्यातून दुसऱ्या खात्यात जमा झाली असल्याचं त्यांना समजलं, अशी माहिती गावदेवी पोलिसांनी दिली. डॉक्टरने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. ही सर्व रक्कम बिहार मधील बिपिन महतोच्या खात्यात जमा झाल्याचे समजल्यावर सापळा रचून बिपिनला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Advertisements

आपलं सरकार