Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

त्यांनी “पत्रं “वाचली आणि “ते ” आजारी पडले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

भारतातून आलेल्या पत्रांमुळे विद्यार्थी पडले आजारी
भारतातून आलेली काही पत्र स्वीकारल्यानंतर मिलाटीनी आणि लेसवास विद्यापीठाचे विद्यार्थी एकाएकी आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्रांमध्ये असलेल्या एका रासायनिक द्रव्यामुळे विद्यार्थी आजारी पडले असल्याचा संशय ग्रीसच्या सुरक्षा यंत्रणांना आला आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने येणाऱ्या अनेक पत्रांसोबत ही पत्र लेसवास आणि मिलाटीनी विद्यापीठांमध्ये पोहोचली. ही पत्र विद्यार्थ्यांनी उघडताच त्यांना अॅलर्जीचा त्रास व्हायला लागला. काही विद्यार्थी आजारीही पडले. त्यानंतर या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या पत्रांची माहिती सुरक्षा यंत्रणांना कळवली. अॅथेन्स, स्पार्टामधील अनेकांनाही अशाच प्रकारची पत्रं आली असल्याचा बाब सुरक्षा यंत्रणांच्या समोर आली. या पत्रांमध्ये इस्लामशी संदर्भात माहिती लिहिलेली आहे. यामुळेच हा अरब देशांमधील एखाद्या दहशतवादी संघटनेचा प्रताप तर नाही अशी शंकाही ग्रीस प्रशासनाला आली आहे.

Advertisements

या पत्रांची रेडिओअॅक्टीव्ह टेस्टही करण्यात येते आहे. ग्रीस आणि भारतामधील संबंध चांगले आहे. या दोन देशांमध्ये कोणताच वैर भाव नाही. त्यामुळे ही पत्र कोणी आणि का पाठवली आहेत याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!