अमिताभसोबत येतोय शाहरुख …

Spread the love

अमिताभ यांच्या “बदला” सिनेमात शाहरुख खानची एंट्री झाली आहे. शाहरुख बदलामध्ये अमिताभ बच्चन यात वकिलाची भूमिका साकारणार आहेत. सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सुजॉय घोष सस्पेंस थ्रीलर सिनेमासाठी ओळखले जातात. त्यांनी याआधी विद्या बालनच्या ‘कहानी’ आणि ‘कहानी 2’ सारखे सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुनीर खेत्रपाल करणार आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. तापसी पन्नूदेखील यात मुख्य भूमिका साकारते आहे. “बदला”ची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असं समजतंय. बदला हा स्पेनिश सिनेमा ‘द इनविसेबल गेस्ट’चा हिंदी रिमेक आहे. उद्यापासून शाहरुख सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सिनेमात तो तापसीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी याआधी ‘भूतनाथ’, ‘मोहब्बतें’, ‘वीर-जारा’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कभी अलविदा न कहना’ सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. बदला सिनेमामध्ये ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.