रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी चालूच

Advertisements
Advertisements
Spread the love

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आज पुन्हा दाखल झाले. यापूर्वी ईडीने वाड्रा यांची दोन दिवस चौकशी केली आहे. परंतु ईडीचे समाधान झालेले नाही. या प्रकरणी बुधवारी ईडीने वाड्रा यांची ६ तासांहून अधिक चौकशी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारीही वाड्रा सुमारे ९ तास ईडीच्या कार्यालयात होते. काल (शुक्रवार) वाड्रा, पत्नी प्रियांका गांधींसोबत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. त्या ठिकाणी त्यांना ईडीने केलेल्या चौकशीबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
वाड्रा यांची लंडनमधील स्थावर मालमत्ता खरेदीबाबतची चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान जप्त केले गेलेले दस्तावेज वाड्रा यांना दाखवण्यात आले. यात फरार संरक्षण दलाल संजय भंडारी यांच्याशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे.

Advertisements

वाड्रा यांची चौकशी करणाऱ्या टीममध्ये ईडीचे संयुक्त संचालक, उप संचालक आणि इतर ५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शनिवारी दिल्लीच्या एका कोर्टाने वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपासून ईडीच्या अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांच्या अंतरिम जामिनासाठीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले. वाड्रा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देताना कोर्टाने ईडीला ६ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे.

Advertisements
Advertisements

वाड्रा हे सर्व प्रश्नांची उत्तरे देत ईडीला योग्य ते सहकार्य करत असल्याचे वाड्रा याच्या वकिलाने बुधवारी म्हटले होते. काँग्रेस पक्ष देखील वाड्रा यांच्या पाठिशी असल्याचे वकिलाने स्पष्ट केले आहे. ईडीच्या चौकशीदरम्यान प्रियांका गांधीही ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मी माझ्या पतीसोबत असल्याचे प्रियांका यांनीही म्हटले होते.

आपलं सरकार