It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

फेसबुक स्टेट्स च्या रागातून चाकण मध्ये तरुणाचा खून

Spread the love

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकण परिसरात शुक्रवारी रात्री आठ जणांच्या टोळक्याने १९ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत बिरदवडे असे मृत तरुणाचे नाव आहे. पियुष धाडगे याची हत्या करण्यासाठी आठ जणांचे टोळके आले होते. प्रशांतने काही महिन्यापूर्वी फेसबुक स्टेट्सवर ‘भूलो मत बदला अभि बाकी है’ अस स्टेट्स ठेवलं होतं. त्याचा राग आरोपींच्या मनात होता. या घटने प्रकरणी एका आरोपीला चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी पियुष धाडगे (१९) याचे आणि मुख्य आरोपी आकाश राजाभाऊ शिंदे यांचे एक वर्षांपूर्वी समर्थ कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये भांडण झाले होते. गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये किरकोळ भांडण सुरु होते. पियुष आपला खून करणार असल्याची माहिती आकाशाला मित्र अक्षय लोमटे मार्फत मिळाली तत्पूर्वी त्याचा आपण काटा काढायचा अस ठरलं.

मित्रांना सोबत घेऊन त्याने कट रचला. तळेगाव चाकण रोडवर प्रशांत आणि पियुष असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर दुचाकीवरुन मुख्य आरोपी आकाश राजाभाऊ शिंदे, पांग्या लांडगे, बफन लांडगे, प्रथमेश जाधव, अक्षय लोमटे, बाब्या राजगुरू, लंगडा, हर्षल खराबी पोहोचले. त्यांनी कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके यांनी दोघांवर हल्ला केला.

जखमी पियुष त्यांच्या तावडीतून निसटला परंतु प्रशांत मात्र सापडला. त्याच्यावर वार केले कारण त्याच्यावर देखील सगळ्यांचा राग होता. त्याने अक्षय लोमटेला याआधी मारहाण केली होती. हल्ल्यात प्रशांतचा मृत्यू झाला आहे. घटनेप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे करत आहेत.