पोलिसांवर हल्ला : गोळीबारात एक दरोडेखोर ठार :

Advertisements
Advertisements
Spread the love

पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक

सोलापूर : सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी हल्ला केला. तेव्हा स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार झाला.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास उळे गावाजवळ गस्त घालताना तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले. एकाला पकडून गाडीत घालत असताना तो दरोडेखोर पोलिसांना ‘साहेब.. चुकले चुकले,’ म्हणत असताना त्याच्यासह इतर सहकाऱ्यांनी हातातील तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने हल्ला केला. तसेच दगडफेकही करण्यात आली.

Advertisements
Advertisements

या हल्ल्यात विजय पाटील गंभीर जखमी झाले. तेव्हा पाटील यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला. यात एक दरोडेखोर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. दरम्यान, या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.
दुसरीकडे, घटनास्थळी सकाळी दोन कार आढळल्या असून यातील एका गाडीचा क्रमांक Mh-13 AZ / 1798 असा आहे. एका गाडीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत.

आपलं सरकार