It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

नागरिकत्व विधेयकाच्या निषेधार्थ मोदींना दाखवले काळे झेंडे !

Spread the love

नागरिक विधेयकामुळे आसाम व ईशान्य भारताचे कोणतेही नुकसान होणार नसून या राज्यांमधील नागरिकांच्या हितसंबंधांना बाधा पोहोचणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊनही वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचा निषेध म्हणून आसाममध्ये शनिवारी किमान दोन ठिकाणी मोदींना काळे झेंडे दाखवण्यात आले. आसामचे आरोग्यमंत्री हिमाता बिस्वा शर्मा यांच्या मतदारसंघामध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर देण्यात येणारे नागरिकत्व हे पुरेशी तपासणी आणि राज्य सरकारच्या शिफारशींनंतरच मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे ईशान्येकडील राज्यांमधील नागरिकांचे हितसंबंध डावलले जाणार नाहीत, असे मोदी म्हणाले. जे देशामध्ये बळजबरीने घुसखोरी करतात आणि ज्यांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून पळून जावे लागते, त्या दोघांमध्ये फरक आहे. हे दोन्ही गट सारखे नाहीत. शेजारी राज्यांमध्ये जे अल्पसंख्याक गट आहेत आणि ज्यांना त्या देशांमध्ये होणाऱ्या अत्याचारांमुळे भारतात येणे भाग पडले, त्यांना आश्रय देण्यास आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईशान्य भारतामध्ये सलग दुसऱ्या दिवशी नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचा निषेध म्हणून आसाममध्ये शनिवारी किमान दोन ठिकाणी मोदींना काळे झेंडे दाखवण्यात आले.