Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये विषारी दारूमुळे 92 जणांचा मृत्यू

Spread the love

हरिद्वार – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला आहे. तर सहारनपूर जिल्ह्यातील 30 हून अधिक लोकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांनी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली आणि बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असणाऱ्या व्यक्तींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच याप्रकरणी अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!