It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

वडिलांसमोरच सामूहिक बलात्कार

file pic

file pic

Spread the love

बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील संतापजनक घटना

पोलीस अधिकाऱ्यांनी गुरूवारी याप्रकरणी माहिती देताना म्हटले की, १९ वर्षीय पीडित युवतीने याप्रकरणी बुधवारी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. कोढोवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत तिच्या गावातील ६ युवकांनी मंगळवारी रात्री उशिरा तिचे घर गाठले आणि पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर ते जबरदस्तीने घरात शिरले आणि तिला बाहेर काढले. त्या युवकांनी तिला घराजवळील एका शेतात नेले आणि वडिलांसमोरच बलात्कार केल्याचे पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपींनी पीडितेच्या वडिलांना झाडाला बांधले होते.संशयित आरोपींनी पीडित युवती आणि तिच्या वडिलांना पोलिसांशी संपर्क न साधण्याची धमकी दिली. ‘सर्व संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून अद्याप एकालाही अटक केलेले नाही’, असे किशनगंजचे पोलीस अधीक्षक कुमार आशीष यांनी सांगितले. ते स्वत: याप्रकरणावर लक्ष ठेवून असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.