Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसाने त्याचेही निधन…

Spread the love

नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी कामगाराचा आगीत मृत्यू

पुण्यातील मोमीनपुरातील चांदतारा चौक येथील बेस्ट बेकरीला लागलेल्या आगीमुळे त्या दुकानासह तीन दुकाने आगीत जळून भस्मसात झाली आहेत. ही घटना बुधवारी सांयकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीच्या घटनेत टेलरिंग कारखान्यामधील एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. विनोद सरोज असे मृत कामगाराचे नाव असून तो तीन दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. तर जखमीचे नाव अस्लम शेख (वय २०) असल्याची माहिती शहजाद मेन्समध्ये काम करणारे सय्यद एजाज यांनी सांगितले.

या घटनेबाबत सय्यद इजाज यांनी सांगितले की, मी चार वाजण्याच्या सुमारास कारखान्यात सर्व कामगारांसोबत बोलून गेलो होतो. त्यानंतर काही क्षणात आगीची माहिती समजल्यावर कारखान्यात आलो. तेव्हा कारखान्यातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. तर माझ्याबरोबर काम करणारे दोन कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली. यातील विनोदचा गुदमरुन मृत्यू झाल्याचे ससून रुग्णालयातून सांगण्यात आले. हे एकूण आम्ही सुन्न झालो आहोत. अस्लम शेख हा कामगार जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

१५ दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन

विनोदने दोन वर्षांपूर्वी देखील आमच्याकडे काम केले होते. त्यानंतर काही वर्षे ब्रेक घेतला आणि पुन्हा म्हणजे मागील आठवडय़ात कामाबाबत बोलणे झाले. त्यानंतर विनोदाच्या कामाचा आजचा तिसरा दिवस होता. त्याच्या वडिलांचे १५ दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्याच्या घरची परिस्थिती खूप नाजूक असून तो मूळचा अलाहाबादचा आहे. आता त्याच्या मागे पत्नी, मुले आणि भाऊ असा परिवार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!