Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘लोकराज्य’ अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रकाशित

Spread the love

मुंबई : फेब्रुवारी 2019 च्या लोकराज्यचे प्रकाशन आज सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या अंकाचे अतिथी संपादक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते. उत्कृष्ट अंकाबद्दल श्री. बच्चन यांनी प्रशंसा केली.

या अंकात ‘गाळ मुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानाच्या यशस्वीतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख, मुख्यमंत्री यांनी कृषी व घरकूल योजनेतील लाभार्थ्यांशी साधलेल्या लोकसंवादाचा संपादित लेख व पाणीपुरवठा व स्वच्छतेतील राज्याची भरारी यावर आधारित लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.

या अंकात सीआयआयच्या जागतिक परिषदेचा वृत्तांत, कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती, सेंद्रीय शेती, बांबू लागवड, जागतिक पशुप्रदर्शन, पीक विमा, स्मार्ट शाळा,उद्योग क्षेत्रातील राज्याची भरारी, फेक न्यूज, नोंदणी व मुद्रांक शुल्क, गेल्या वर्षभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी, प्रेरणा व राज्यसेवेची तयारी कशी करावी यासंबंधी लेखांचाही या अंकात समावेश करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी हा अंक उपयुक्त आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून अंक सर्वत्र उपलब्ध आहे.

या कार्यक्रमाला केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर,जागतिक बँकेचे हिशाम काहीन, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!