Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांची कसून चौकशी

Robert Vadra, center, son-in-law of Congress party leader Sonia Gandhi arrives to appear before the Enforcement Directorate in New Delhi, India, Wednesday, Feb. 6, 2019. (AP Photo)

Spread the love

चार तास आणि ३६ प्रश्न, ईडीकडून रॉबर्ट वड्रा यांची कसून चौकशी

 

सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांची  कसून चौकशी करण्यात आली. तब्बल चार तास चाललेल्या या चौकशीत रॉबर्ट वड्रा यांना ३६ प्रश्न विचारण्यात आले. यावेळी रॉबर्ट वड्रा यांनी आपली लंडनमध्ये कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला. तसंच डीलमध्ये सहभागी असणाऱ्या कोणालाही ओळखत नसल्याचं सांगितलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर

(ईडी) हजर झाले होते. यावेळी त्यांची पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होत्या. रॉबर्ट वड्रा यांना सक्तवसुली संचलनाल कार्यालयात सोडून प्रियंका गांधी परतल्या. पटियाळा न्यायालयाने आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी रॉबर्ट वड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

 

या प्रकरणात रॉबर्ट वड्रा यांची लंडनमध्ये नऊ ठिकाणी संपत्ती असून त्याची कोटींमध्ये किंमत असल्याचा आरोप आहे. २००५ ते २०१० दरम्यान वड्रा यांनी ही संपत्ती खरेदी केली असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्ट वड्रा यांनी आर्म्स डिलर संजय भंडारी आणि त्याचा चुलत भाऊ सुमीत चढ्ढा यांच्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. यासोबतच लंडनमधील संपत्तीत आपला सहभाग नसल्याचाही दावा केला आहे.

रॉबर्ट वड्रा यांनी यावेळी आपण मनोज अरोराला ओळखत असल्याचं सांगितलं. मनोज अरोरा स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. कंपनीचा माजी कर्मचारी आहे. वड्रा यांच्याशी संबंधित या कंपनीने २००८ मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून ३.५ एकर जमीन ७.५० कोटी रुपयांना खरेदी केली. त्यानंतर स्कायलाइटने डीएलएफला हीच जमीन ५८ कोटी रुपयांना विकली आणि ५०९ कोटी रुपये नफा कमाविला, अशी नोंद एफआयआरमध्ये आहे. आपण मनोज अरोराला ओळखत असलो तरी त्याने आपल्यासाठी काही ई-मेल लिहिले नसल्याचं रॉबर्ट वड्रा यांनी सांगितलं असल्याचं सुत्रांकडून कळलं आहे.

 

काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ईडीसमोर चौकशीला जाताना पती रॉबर्ट वड्रा यांना सोबत देऊन एकाप्रकारे विरोधकांना उत्तर दिलं. पत्रकारांनी प्रियंका गांधी यांना रॉबर्ट वड्रा यांच्या चौकशीबद्दल विचारलं असता आपण आपल्या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभ्या असल्याचं सांगितलं. प्रियंका आणि रॉबर्ट पांढऱ्या रंगाच्या टोयोटा लँड क्रूझरमधून ईडीच्या कार्यालयात पोहोचले. प्रियंका यांनी रॉबर्ट यांना ईडी कार्यालयाबाहेर ड्रॉप केले आणि त्या त्यांच्या ताफ्यासह निघून गेल्या.

रॉबर्ट वाड्रा अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जाताना त्यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी वाड्रा त्यांच्यासोबत होत्या. पतीची साथ देत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना संदेश दिला की त्यांचा त्यांच्या पतीला पूर्ण पाठिंबा आहे. पतीला ईडीच्या कार्यालयात सोडून त्या परतल्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेस मुख्यालयात जात आपल्यावर सोपवलेली नवी जबाबदारी स्वीकारली. काँग्रेस मुख्यालयात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘ते माझे पती आहेत. ते माझं कुटुंब आहेत आणि मी माझ्या कुटुंबाच्या कायम पाठीशी आहे.’ मनी लाँडरिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. यामागे सूडाचे राजकारण आहे का असे विचारता त्या म्हणाल्या, ‘प्रत्येकाला ठाऊक आहे की हे का घडत आहे.’

दरम्यान, प्रियंका काँग्रेस मुख्यालयात पोहोचताच तेथे उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘प्रियंका गांधी जिंदाबाद’, ‘प्रियंका नही ये आंधी, दूसरी इंदिरा गांधी’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!