सोनू निगम आयसीयूमध्ये भरती

Spread the love

बॉलिवूड सिंगर सोनू निगम सध्या रूग्णालयात उपचार घेतोय. सी फूड खाण्याचे निमित्त झाले आणि सोनूला गंभीर अ‍ॅलर्जी झाली. यामुळे त्याचा एक डोळा सुजला. यानंतर लगेच त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले.
सोनूने स्वत: इन्स्टाग्रामवर आपले दोन फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. सी फूड खाल्ल्यामुळे माझ्यावर ही वेळ आली. रूग्णालयात पोहोचायला आणखी उशीर झाला असता तर गंभीर स्थिती ओढवली असती. माझ्या श्वसननलिकेला सूज आली असती आणि मी श्वास घेऊ शकलो नसतो, असे सोनूने म्हटले आहे. अ‍ॅलर्जीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही त्याने दिला आहे. एका फोटोत सोनू आयसीयूमध्ये भरती असलेला दिसतोय तर दुसºया फोटोत त्याचा डावा डोळा सुजलेला दिसतोय. तूर्तास सोनूची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *