Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात, कर्जे होणार स्वस्त

Spread the love

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर

केंद्राच्या अंतरिम बजेटनंतर आता रिझर्व्ह बँकेने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण जाहीर झाले असून त्यानुसार, रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत ही घोषणा केली. २८ जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दर कमी करण्याचे संकेत दिले होते. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ताही कमी होणार आहे. दरम्यान, यंदाच्या २०१९-२०च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा ७.४ राहण्याची शक्यता आरबीआयने वर्तवली आहे. त्याचबरोबर महागाईचा दर ३.२ टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहिल्या सहामाहित हा दर ते ३.४ आणि तिमाहित ३.९ टक्के दर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!