It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

नायब तहसीलदार गितांजली गरड यांना अटक

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

पुणे : प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बनावट आदेश बनविले असल्याचे माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष करुन शेरे मारले. त्यामुळे शिरुर तालुक्यातील ६० एकराहून अधिक शासकीय जमीनीचे बेकायदा हस्तातंरण झाल्याने केलेल्या चौकशीत सहभाग असल्याचे दिसून आल्याने तत्कालीन नायब तहसीलदार व अन्न धान्य वितरण परिमंडळ अधिकारी गितांजली नामदेवराव गरड यांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे.

शिरुर तालुक्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या जमिनी बनावट पुर्नवसनाचे आदेश तयार करुन त्याचे भोगवटा वर्ग बदलला गेल्याने शासकीय निर्बंध डावलले गेले. अशा जमिनी पुन्हा सर्वसामान्यांना विक्री केल्या गेल्या आहेत़ त्यामुळे एकीकडे शासनाची व दुसरीकडे गरीबांची अशी दुहेरी फसवणूक झाली आहे.

Advertisements


Advertisements

याप्रकरणी यापूर्वी लिपिक सुभाष नळकांडे, कासारी तलाठी सचिन देवप्पा काळेल यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच लिपिक चंद्रशेखर ढवळे, मंडल अधिकारी बळीराम खंडुजी कड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत.

विविधा