एकतर्फी प्रेमातून तरुणाचा गोळीबार

Spread the love

एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून २३ वर्षीय बेरोजगार इंजिनिअरने तरूणीच्या हॉस्टेलमध्ये जाऊन गोळीबार केला आहे. बालेवाडीमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारत पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची घटना बालेवाडीतीव नीक मार्क कॉलेजच्या लेडिज हॉस्टेलमध्ये घडली. सूरज महेंद्रकुमार सोनी (मध्य प्रदेश) असे त्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज सोनी हा मूळचा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. सूरजचेच कॉलेजमधील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तिला प्रपोज केलं असता तिने नकार दिला. त्या मुलीने त्याचे फोन उचलणेही बंद केले. यामुळे तिला घाबरवण्यासाठी सूरजने सरळ लेडिज हॉस्टेल गाठलं, तेथे त्या तरूणीशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोलण्यासही तिनं नकार दिल्याने सूजने तिला घाबरवण्यासाठी आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून होस्टेलमधील गोंधळ सुरू झाला. मुली जमा होत असल्याचे पाहून त्याने स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी हॉस्टेल पाचव्या मजल्यावरुन पळ काढला. यामध्ये तो जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पुस्तुल जप्त केले आहे. त्याच्याकडे पिस्तुल कसे आले याचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *