Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्या प्रदर्शित होत आहेत ९ मराठी चित्रपट !!

Spread the love

कोणता चित्रपट बघावा असा संभ्रम…

उद्या प्रदर्शित होणार तब्बल नऊ मराठी चित्रपट या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर एक-दोन नाही, तर तब्बल नऊ चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नेहमीच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही अशी ओरड होत असते. पण याला स्वत: मराठी चित्रपट निर्मातेच जबाबदार असल्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. कारण, एकाच नऊ चित्रपट वेळी रिलीज होत असल्याने थिएटरचे गणित जुळवायचे कसे असा प्रश्न वितरकांसमोर उभा राहिला आहे.

भाई व्यक्ती की वल्ली उत्तरार्ध, आसूड, दहावी, लकी, प्रेमरंग, प्रेमवारी, रेडिमिक्स, उनाड मस्ती, धरपड हे चित्रपट या शुक्रवारी रिलीज होतील. यामध्ये नामांकित निर्मात्यांचे चित्रपट आहेतच, पण काही नवख्या निर्मात्यांनीही याचदिवशी आपला चित्रपट प्रदर्शित करण्याचा अट्टहास धरला आहे. पण हा अट्टाहास सगळ्यांच्याच गळ्याशी येण्याची शक्यता आहे. कारण, एकदम एवढे चित्रपट सोबत प्रदर्शित होणार म्हटल्यावर थिएटर मिळत नाही अशी ओरड पुन्हा एकदा केली जाण्याची शक्यता आहे.

तब्बल पाच चित्रपट मागच्या आठवड्यातही प्रदर्शित झाले होते. आधीच प्राईम टाईम शो मिळावा म्हणून हिंदी चित्रपटांसोबत मराठी चित्रपटांची रस्सीखेच सुरु आहे आणि त्यातच मराठी चित्रपट निर्मात्यांचा असा गोंधळ असणे, आपसातच रस्सीखेच सुरु असणे खरोखरचं घातक आहे. आता नेमका कोणता चित्रपट बघावा असा संभ्रम प्रेक्षकांमध्येही निर्माण झाला असल्यामुळे चित्रपट निर्माते भविष्यात तरी जागे होतील आणि असा गोंधळ टाळतील अशी आशा करायला हरकत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!